चंदीगढ : पंजाबमधील चंदीगढमध्ये एका २२ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मॅरेज पॅलेस हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कबीर राय याने स्टोअर रूममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. कबीरने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या शवविच्छेदन अहवालातून एक धक्कादायक खुलासा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंदीगढपासून काही अंतरावर जीरकपूर ठिकाण आहे. या जीरकपूरजवळ एक पूल आहे. या पुलाच्या बाजूला मॅरेज पॅलेस हॉटेल आहे. या हॉटेलमध्येच कबीर शिपायाचे काम करत होता. कबीरला आई-वडील नसल्याने तो आणि त्याची बहीण निर्मला दोघेच राहायचे. कबीरने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या शवविच्छेदन अहवालातून एक धक्कादायक खुलासा झाला आहे. २० दिवसांपूर्वीच कबीरच्या प्रेयसीने आत्महत्या केली होती. तिच्या जाण्याचे दुःख सहन न झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याची सुसाइड नोट कबीरने लिहिली होती. तिच्या अस्थी जिथे विसर्जन केल्या आहेत तिथेच माझ्याही अस्थींचे विसर्जन करण्याचे त्याने नोटमध्ये लिहिले होते.


 
दरम्यान, कबीरच्या शवविच्छेदनानंतर तो मुलगा नसून मुलगी असल्याचा खुलासा झाला. याबाबत त्याची २० वर्षीय बहीण निर्मला हिला सांगण्यात आले. निर्मलाने आपला भाऊ मुलगी असल्याचे माहिती नसल्याचे सांगितले. कबीरने त्याची ओळख लपवून का ठेवली, याबाबत चौकशी सुरू आहे. शारीरिकदृष्ट्या मुलगी असतानाही ती स्वत:ला मुलगा समजत होती. याला जेंडर डिस्फोरिया म्हटले जाते. अमेरिकी शास्त्रज्ञांनुसार, ही एक अशी अवस्था आहे ज्यात लोक आपल्या शारीरिक लिंगाला विरूद्ध लिंग असल्याचे भासवतात.


काही लोक याला खुलेपणाने सर्वांसमोर आणतात तर काही जण लपवून ठेवतात आणि दुहेरी जीवन जगतात.