धक्कादायक ! युवकाने लहान मुलीच्या तोंडात फोडला सुतळी बॉम्ब
अशी घटना घडली ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला
मेरठ : दिवाळीच्या एक दिवस आधी उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये अशी घटना घडली आहे ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 3 वर्षाची मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. जेव्हा एका युवकाने तिच्या तोडांत सुतळी बॉम्ब फोडला. ही माहिती मिळताच बुधवारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती आहे.
एनडीटीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, ही घटना मंगळवारी मिलक गावात घडली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे. मुलीचे वडील शशिी कुमार यांनी स्थानिक युवक हरपाल याच्यावर आरोप केले आहेत. हरपाल सध्या फरार असल्याचं बोललं जातंय.
हरपालने मुलीच्या तोंडात बॉम्ब फोडल्याने 50 टाके लागले आहेत. मुलीच्या गळ्यात देखील त्यामुळे इंफेक्शन झालं आहे. सध्या डॉक्टर मुलीवर उपचार करत आहेत.