#boycottamazon : सध्या #boycottamazon कॅम्पेन  जोरात सुरु आहे आणि त्याला कारणही तसेच आहे,काल देशभरात  कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला ,एकीकडे काल देशभरात सगळीकडे कृष्ण जन्माष्टमीचा  माहौल होता सगळे राधे कृष्णाच्या भक्तीत लीन होते तर दुसरीकडे मात्र ऍमेझॉन या इ-कॉमर्स साईटवर काही भलतंच चालू होत जे अत्यंत संतापजनक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऍमेझॉन वर भगवान श्रीकृष्ण आणि राधेच एक पेंटिंग विक्रीसाठी ठेवण्यात आलं होत आणि त्यानंतर हा वाद सुरु झाला.पेंटिंग विक्रीसाठी ठेवणं हा वादच नाहीये खरा वाद हा आहे कि जे पेंटिंग विक्रीसाठी ठेवण्यात आलं ते भगवान श्री कृष्ण आणि राधेचं अश्लील पेंटिंग आहे. हे पाहिल्यानंतर मात्र सोशल मीडियावर या प्रकरणाचा वाद चिघळला आहे ऍमेझॉन वर बंदी घालावी म्हणून कॅम्पेन सुरु करण्यात आलं आहे . 


ही पहिलीच वेळ नाहीये 
थट्टा करायला ,सो कॉल्ड विषय मांडायला यांना हिंदू देवताच का सापडतात असा प्रश्न सध्या विचारला जात आहे .. 
एम एफ हुसेन तुम्हाला माहीतच असेल हिंदू देवतांची अश्लील चित्र रंगवणारा हा व्यक्ती. त्याच्यावर सुद्धा बराच वाद झाला होता. 


हल्लीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली 'काली' डॉक्युमेंट्री ..यात 'माता काली' ला चक्क सिगारेट पित असताना दाखवण्यात आलं .



मासूम सवाल सिनेमाच्या पोस्टरवर भगवान श्री कृष्ण सॅनिटरी पदावर दाखवण्यात आलाय 


इतकचं काय तर नुकतंच कन्याकुमारीत एका लग्नाच्या शुभेच्छा देणारा बॅनर लावला होता ज्यात भगवान शंकर सिगारेट पेटवतानाचा फोटो छापण्यात आला.


 


एकूणच काय हिंदू देवतांचा अशाप्रकारे अपमान वारंवार होत आहे आणि याला आळा बसं हे अत्यंत गरजेचं आहे .