Viral News: `कोणी घरी नाही, लवकर ये`, तो घरी पोहोचल्यावर प्रेयसीच्या घरच्यांनी चांगलेच बदडले
UP News: बांदा येथे एका तरुणाला चोर समजून घरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना तरुणीच्या भावांनी त्याला बेदम मारहाण केली. ही बाब सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
UP Boyfriend beaten by girlfriend's brothers : एक धक्कादयक घटना समोर आली आहे. प्रेमात पडलेल्या तरुणासोबत एक वाईट प्रकार घडला. त्याच्या मैत्रिणीने घरी बोलावले आणि तिच्या कुटुंबीयांनी मारहाण केली. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा (Banda) येथील हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. खरं तर, एका तरुणाला मैत्रीणीने घरी बोलावले होते. तो घरात जात असताना मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला मारहाण केली. तरुणाच्या म्हणण्यानुसार, त्याचे तरुणीवर प्रेम असून त्यानेच तिला आपल्या घरी बोलावून घरी कोणी नाही, ये, असे सांगितले होते. मात्र तेथे गेल्यावर त्यांना जबर मारहाण करण्यात आली. मुलीचे कुटुंबीय बाहेर गेले नव्हते. ते घरीच होते.
मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाला चोर समजून बेदम मारहाण केली. मुलाने सांगितले की, त्याला रात्री त्याच्या मैत्रिणीचा फोन आला आणि ती म्हणाली की घरी कोणी नाही, तू घरी ये. यानंतर जेव्हा तो मुलीच्या घरी पोहोचला आणि घरात प्रवेश करत असताना मुलीच्या भावांनी त्याला चोर समजून पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्या तरुणाला मोठी दुखापत झाली. मुलीला भेटणे त्याला चांगलेच महागात पडले.
तरुणाने घडलेला प्रकार सांगितला
तरुण मुलीच्या घरी पोहोचल्यानंतर मारहाणीनंतर तो कावराबावरा झाला. त्याला काही समजायच्या आता थेट धक्काबुक्की झाली. मात्र, मारहाण झाल्यामुळे आजूबाजूचे लोकही जमा झाले आणि त्यांनी हा वाद कसातरी मिटवला. यानंतर तरुणाने सगळा प्रकार सांगितला की, तो कोण होता, तो तिथे का आला होता आणि त्याला कोणी बोलावले होते?
मैत्रिणीसाठी तरुणाने आणले होते गिफ्ट
तरुणाने सांगितले की, त्याला त्याच्या मैत्रिणीला घड्याळ द्यायचे होते. त्याने तिच्यासाठी घड्याळही आणले. मात्र जेव्हा तो प्रेयसीच्या घराच्या दारात पोहोचला आणि घरात प्रवेश करु लागला तेव्हा त्याला बेदम मारहाण करण्यात आली. प्रेयसीने त्याला खोटी माहिती का दिली, हे अजूनही मुलाला समजले नाही?
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मारहाणीनंतर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलाची प्रकृती आता धोक्याच्याबाहेर आहे, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.