`या` कारणासाठी मुलांनी धरले मुलींचे पाय, म्हणाले `आता फक्त तुमचाच आधार`
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबई : भारतात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या निवडणुका होतात. निवडणुकीत राजकारणी जनतेने त्यांना मत द्यावे म्हणून कोणत्याही थराला जातात. मोठ्या निवडणुकांमध्ये हे सामान्य आहे, पण आता विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांमध्येही ते होऊ लागलं आहे. राजस्थानच्या भरतपूरमधून एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विद्यार्थी युनियनच्या निवडणुकीत मतं मागण्यासाठी उमेदवार मुलींचे पाय धरून विनवणी करताना दिसत आहेत.
काल 26 ऑगस्ट रोजी राजस्थानमधील अनेक विद्यापीठं आणि त्यांच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. करोना महामारीमुळे राज्यात तब्बल दोन वर्षांनी विद्यार्थी संघाच्या निवडणुका होत आहेत. जयपूरमधील राजस्थान विद्यापीठ या राज्याच्या प्रमुख शैक्षणिक संस्थेमध्ये सुमारे 20,700 विद्यार्थांकडे यंदाच्या वर्षी मताधिकाराचा हक्क आहे. याचा अर्थ ही मुलं मत देण्यासाठी ठरवलेल्या वयोगटात येतात.
याविषयी बोलताना विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, राज्यभरातील सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार असून शनिवारी मतमोजणी होणार आहे.
राजस्थान विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत मुख्य लढत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात आहे. राजस्थान विद्यापीठात अध्यक्षपदासाठी एनएसयूआयकडून रितू बराला, एबीव्हीपीकडून नरेंद्र यादव, अपक्ष निहारिका जोरवाल, निर्मल चौधरी, प्रतापभानू मीना आणि हितेश्वर बैरवा हे उमेदवार रिंगणात आहेत.
निहारिका ही राज्य सरकारमधील मंत्री मुरारी लाल मीना यांची मुलगी आहे, जिने एनएसयूआयचे तिकीट न मिळाल्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मंगळवारी उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान अभाविपच्या दोन उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले. मात्र, नंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध मानले गेले.