Brain Teaser: फोटोतल्या टी-शर्टला किती होल आहेत? 99% लोकांचं उत्तर चुकतं
Brain Teaser IQ Test: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमधील टी-शर्टला नेमके किती होल आहेत याबद्दल अनेकांनी वेगवेगळी उत्तरं दिली आहेत. तुम्हाला माहितीये का बरोबर उत्तर?
Viral Brain Teaser IQ Test: सोशल मीडियावर अनेक कोटी, रंजक प्रश्न आणि मजेदार कंटेंट व्हायरल होत असतो. त्यातही डोक्याला खाद्य पुरवणारे ब्रेन टीझर्स नेटकऱ्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय असतात. ब्रेन टीझर्सअंतर्गत येणाऱ्या पोस्टवर हजारोंच्या संख्येनं कमेंट्स पाहायला मिळतात. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने या पोस्टमधील प्रश्न किंवा चित्र समजून घेण्याचा आणि त्याचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न करत उत्तर देत असतो. सामान्यपणे ब्रेन टीझर्स हे केवळ मनोरंजन म्हणून नाही तर त्यात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा आयक्यू किती आहे हे समजून घेण्यासाठीही फायद्याचे ठरतात.
ब्रेन टीझर बरंच काही सांगतात
एखादी व्यक्ती तर्कबुद्धी कशी वापरते, समस्येकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन कसा आहे हे ब्रेन टीझर्सच्या माध्यमातून समजते. केवळ उत्तर शोधणं नाही तर किती वेगाने आपण माहिती घेऊन त्याचं निराकरण करतो हे सुद्धा असा व्हायरल पोस्टमधून समजतं. चित्रातील, प्रश्नातील बारके टीपण्यावरुनही व्यक्तीच्या विचारसरणीचा अंदाज बांधता येतो. आज आपण या ठिकाणी ज्या ब्रेन टीझरबद्दल बोळणार आहोत त्यामध्ये तुमची विचारशक्ती किती वेगवान आहे आणि तुम्ही कसा विचार करता याची चाचपणी होणार आहे.
नेमका प्रश्न काय?
प्रश्न तसा फार सोपा आहे, तो म्हणजे फोटोत दिसणाऱ्या टी-शर्टला नेमके किती होल आहेत (How Many Holes Are In This T-Shirt?) हे तुम्हाला 5 सेकंदांमध्ये सांगायचं आहे. ज्यांची निरिक्षण शक्ती फारच उत्तम आहे त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर 5 सेकंदांमध्ये देता येतं. चला तर मग हा फोटो पाहून सांगा या टी-शर्टला किती होल आहेत ते...
दिसतं तसं नसतं
आता वर वर पाहता सरळ समोर अगदी टी-शर्टाच्या पलिकडे दिसणारे होल तुम्हाला दिसत असतील. मात्र दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं म्हणतात. तसाच हा प्रकार आहे. थोडा डोक्याला अजून ताण देऊन नीट विचार करा. प्रश्न नीट समजून घ्या, या टी-शर्टला किती होल आहेत?
99 टक्के लोकांना 5 सेकंदात येत नाही उत्तर
काय सापडलं का उत्तर? किती म्हणताय? 4 की 6 की इतर काही आकडा आहे तुमचं उत्तर? एकदा विचारपूर्वक या टी-शर्टकडे पाहा. 99 टक्के लोकांना या प्रश्नाचं पाच सेकंदात उत्तर देता येत नाही. परत एकदा विचार करा. हवं तर पुन्हा एकदा हा फोटो पाहा...
उत्तर काय?
नाही सापडत उत्तर? चला आम्ही सांगतो या टी-शर्टला किती होल आहेत. तर चित्रात दिसणाऱ्या टी-शर्टला होल किती? या प्रश्नाचं बरोबर उत्तर 8 असं आहे. दोन बाह्यांसाठीच्या जागा, एक मानेजवळ, एक तळाशी आणि शर्टाच्या मध्य भागी आरपार दिसेल अशी पडलेली दोन मोठी होल म्हणजेच पुढचं आणि मागचं कापड पकडून चार होल झाले. या साऱ्याची बेरीज 8 येते. अजूनही समजलं नसेल तर खालचा फोटो पाहा...
तुम्ही पहिल्या प्रयत्नात दिलेलं उत्तर बरोबर होतं की चूक कमेंट करुन नक्की कळवा.