नवी दिल्ली : Inflation-GST News : महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं आज देशभरात आंदोलन करणार आहे. (Congress attack on inflation-GST) राष्ट्रपती भवनावर काढणार मोर्चा काढण्यात येणार आहे. तर पंतप्रधान भवनालाही घेराव घालण्याची काँग्रेसची योजना आहे. दरम्यान, कार्यकर्ते आक्रम झाले आहेत. त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली असून कार्यकर्त्यांनी गॅस सिलिंडरशिवाय रस्त्यावर अन्न शिजवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, दिल्लीतील अकबर रोडवरील येथे पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. तर काँग्रेस कार्यकर्ते पक्ष कार्यालयाजवळ येण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी पोलीस उपस्थित होते. जंतर-मंतर वगळता नवी दिल्ली जिल्ह्यातील संपूर्ण परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.


महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस पक्षातर्फे हे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. महागाईचा मोठा निषेध म्हणून पक्षाने संसद ते राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान भवनापर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान भवनाचा घेराव करण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या या मोर्चाला पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


 देशव्यापी निदर्शनासाठी पक्षाने कार्यालयात पूर्ण व्यवस्था केली आहे. देशभरातून महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले आहे. काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या राहण्यासाठी आणि झोपण्यासाठी तंबू उभारण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यालयातून पंतप्रधानांच्या घराचा घेराव करणाऱ्या टीमचे नेतृत्व काँग्रेस नेत्या प्रियका गांधी करणार आहेत. तसेच संसदेतून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणाऱ्या खासदारांच्या चमूचे नेतृत्व राहुल गांधी करणार आहेत.


काँग्रेस खासदार राहुल गांधी आज सकाळी महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत.  राहुल गांधी काँग्रेस कार्यालयातून पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी काय बोलणार याची उत्सुकता आहे.