CBSE Board Exam Dates : येत्या दोन दिवसात नवीन वर्षाचे आगमन होणार आहे. यासाठी सर्वांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तयारीला सुरूवात करावी लागणार आहे. कारण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.  (CBSE 10th, 12th Board Exam Date). अधिकृत प्रकाशनानुसार, CBSE च्या 10वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होतील आणि 21 मार्च 2023 रोजी संपतील. तर त्याचवेळी 12वीची परीक्षा देखील 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत चालणार आहे. अशा परिस्थितीत, ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षी CBSE  बोर्डाच्या परिक्षेसाठी अर्ज केला आहे ते बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbse.nic.in वर जाऊन तारीख पत्रकाची PDF डाउनलोड करू शकतात. यावेळी 34 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2023 साठी नोंदणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; आईचं 100 व्या वर्षी निधन 


बोर्डाने जारी केलेल्या डेटशीटनुसार, दहावीची इंग्रजीची परीक्षा 27 फेब्रुवारीला, विज्ञानाची 4 मार्चला, सामाजिक शास्त्राची 15 मार्चला, हिंदीची 17 मार्चला आणि गणिताची मूलभूत/इयत्ता 12 मार्च 2023 रोजी होणार आहे.


10वीची संपूर्ण तारीखपत्रक येथे पहा



12वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान


CBSE ची 12वी बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत होणार आहे. अधिकृत अधिसूचनेमध्ये, सीबीएसईने म्हटले आहे की, "12वीची तारीखपत्रक तयार करताना, जेईई (मुख्य) सह स्पर्धात्मक परीक्षांचा विचार केला गेला आहे."