नवी दिल्ली : इराणने अमेरिकेच्या तळांवर हल्ला चढवल्यावर जागतिक बाजारात इंधन दर कमालीचे भडकलेत. बाजारात बेन्चमार्क कच्चा तेलाचा भावानं सोमवारी प्रति बॅरल  ७० डॉलर्सचा आकडा पार केलाय. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही सौदी अरामकोवर झालेल्या हल्ल्यानंतर कच्चा तेलाचा भाव ७० डॉलर्सच्या वर गेला होता. अमेरिका आणि ईराणच्या युद्धामुळे आखाती देशांत तणाव वाढलेला दिसतोय.


भारतावर होणार परिणाम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याचा थेट परिणाम भारतामध्ये दिसून येऊ शकतो. कच्च्या तेलाचा पुरवठा बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यानं किंमतीत सतत वाढ होत जाताना दिसतेय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत सोमवारी अधिक वाढ झाली तर भारतीय वायदे बाजारात कच्चा तेलाचे भाव ३ टक्क्यांहून अधिक वाढले. 


तसंच भारतासाठी इराण अनेक गोष्टींसाठी महत्त्वाचा देश आहे. चीननंतर भारतच असा देश आहे जो ईराणकडून सर्वाधिक तेल खरेदी करतो. त्यामुळे अमेरिका-इराणच्या युद्धाचा थेट परिणाम भारतावर होईल. भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर आणि जीवनावश्यक हा परिणाम लगेचच दिसून येऊ शकतो. 



अभ्यासकांच्या म्हणण्याप्रमाणे, मध्य-पूर्व भागात असाच तणाव वाढत राहिला तर भारतात पेट्रोलच्या किंमती ९० रुपये प्रति लीटरचा आकडा ओलांडू शकतात. 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकवर बंदी घालण्याचा इशारा दिल्यानंतर आखाती क्षेत्रात संकट घोंघावताना दिसतंय.