Bridal angry video: लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन. लग्न म्हणजे विश्वास, आधार आणि कधीही न संपणार चिरंतर नातं. परंतु कधी कधी नात्यात अशा काही गोष्टी कराव्या लागतात ज्या लग्नाच्या नंतरच काय लग्नाच्या आधीही सांभाळाव्या लागतात. आणि लग्नाच्या वेळी तर सर्वात जास्त. याचं कारण काय? असा जर प्रश्न तुम्ही विचारत असाल तर हा (Wedding Video) व्हिडीओ तुम्ही एकदा पाहाच. (bride angry video she got angry on his would be husband on wedding day)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वधू आणि वर त्यांच्या लग्नाच्या दिवशी सर्वात जास्त आनंदी आणि सर्वात उत्साही तर असतातच परंतु लग्नाच्या दिवशी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल ते अस्वस्थ आणि चितेंंत देखील असतात. यात शंका नाही की वधू-वरांसाठी त्यांच्यासाठी लग्नाचा दिवस जितका खास असतो त्याचप्रमाणे कठीणही असतो. नववधूच्या मनात तिच्या लग्नाच्या लूकपासून तिच्या ब्राइडल (Bride Angry Video) एन्ट्रीपर्यंत, कुटुंब सोडून नव्या कुटुंबात जाऊन नवीन आयुष्य सुरू करण्यापर्यंत अनेक गोष्टी असतात. वधूच्या मनात तेव्हा अनेक भावना, विचार येत असतात. 


आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे


पण लग्नाच्या दिवशी अशा एका नव्या (Bride and Bridegroom on Wedding Day) नवरीसोबत असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला आहे. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला चक्क ती शिवीगाळ करत होती. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की तिला आलेल्या रागानं ती अख्खं घर डोक्यावर घेते. नक्की असं तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं काय केलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 


 

 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



जेव्हा वधूला लग्नाच्या दिवशी उशीर होऊ लागतो, तेव्हा ती वराला फोनकरून लवकरच येण्यासाठी बोलावते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वधू वराला कॉल करते आणि लग्नाला येयाला उशीर का होतोय यावर त्याला जाब विचारते. आणि जर लवकरच नाही आला तर लग्न मोडेन असं म्हणून लागते.


आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'


व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गुलाबी रंगाचा लेहेंगा घातलेली वधू मिरवणूक वेळेवर न आल्याने त्याच्यावर चिडलेली दिसत आहे. ती चिंताग्रस्त आणि तणावग्रस्त दिसते आहे. ती म्हणते, 'ट्रॅफिक नहीं होगा क्या. येण्याची गरज नाही, कृपया आता येऊ नकोस. ही प्रतिक्रिया पाहून वधू वराला किती रागावली होती, हे समजू शकते. मात्र, काही सेकंदांनंतर वधू 'निकल जलदी यार, प्लीज, बाय' म्हणताना ऐकू येते. व्हिडिओमध्ये हे दृश्य खूपच मजेदार दिसत असले तरी वधूसाठी ते खूपच तणावपूर्ण आहे. bridal_lehenga_designn नावाच्या पेजने शेअर केलेल्या व्हिडिओला 142K पेक्षा जास्त व्ह्यूज आणि हजारो लाईक-कमेंट्स मिळाल्या आहेत.