नणंदेच्या सांगण्यावरून नववधूने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
भारतात लग्न म्हटलं की आनंद सोहळा असतो. नाच गाणं, जेवण, पाहुणे, नातेवाईक असं आनंददायी वातावरण असतं.
नवी दिल्ली: भारतात लग्न म्हटलं की आनंद सोहळा असतो. नाच गाणं, जेवण, पाहुणे, नातेवाईक असं आनंददायी वातावरण असतं. सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वधू-वर आणि नातेवाईकांचे डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.उत्तर भारतात हा एक प्रकारचा विवाहोत्तर सोहळा आहे. यात नववधूला सासरच्या मंडळींसोबत नृत्य करावे लागते. नववधू पहिल्यांदाच सासरी आल्यानंतर तिच्या नणंदने तिला डान्स करण्याची विनंती केली. नववधूने देखील नणंदनेची विनंतीचा मान ठेवला.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नवीन नवरी खोलीत बसली आहे, तेव्हाच नणंद तिथे पोहोचते. त्यानंतर ती एक हरियाणवी गाणे वाजवते, ज्यावर ती नववधूला नृत्यासाठी आमंत्रित करते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हरियाणवी गाणे वाजवल्यानंतर ती व्यवस्थित नाचेल की नाही याबाबत शंका येते. नणंदेला वाटतं की '52 गज का दमन' या गाण्यावर ती नाचू शकणार नाही. नव्या नवरीने नाचायला सुरुवात केल्यावर तिच्या नणंदेला आश्चर्य वाटते.
नववधूने आपल्या नृत्याने कुटुंबातील सर्व सदस्यांना आश्चर्यचकित केले. या गाण्यावर नववधूने केलेले जबरदस्त डान्स स्टेप्स पाहून सगळेच तिला पाहात राहिले. हा व्हिडीओ byohbaraat नावाच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की त्याला आतापर्यंत कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटिझन्सकडून प्रतिक्रिया येत आहेत.