Bride Groom Kiss: मंडपातच वधू-वर झालेत रोमँटिक, दोघेही स्वतःला रोखू शकले नाहीत आणि ...
Kissing Video: आपल्या आयुष्यात लग्न ही अशी गोष्ट आहे की काही लोक खूपच उत्साहित असतात. मात्र, कधी कधी तुमचा उत्साह लोकांचा चर्चेचा विषय होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Bride And Groom Kissing Viral Video: काही लोक आपल्या लग्नाबाबत ( marriage) खूपच उत्साहित असतात. असाच एक प्रकार मंडपात घडला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतातील कुठल्यातरी शहरातील आहे, त्यामुळे लोक त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. काहींना तो आवडला तर अनेकांना आवडलेला नाही. वधू आणि वर एकमेकांना किस करत आहेत. जेव्हा लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, तेव्हा यूजर्सची प्रतिक्रिया पाहण्यासारखी असते. कधी व्हिडिओ लाइक करतात तर कधी राग व्यक्त करतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये वधू आणि वर त्यांच्या एका कृतीमुळे (Romance) व्हायरल झाले आहेत. यामध्ये पाहुण्यांसमोर दोघेही एकमेकांशी अधिकच रोमँटिक झाले.
एकीकडे मंडपाचे मंत्रांचे पठण आणि दुसरीकडे प्रणय
लग्नाचा हा व्हिडिओ एका यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हे पूर्ण खरं प्रेम आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की लग्नाची तयारी सुरु आहे आणि पंडितजी मंत्र पठण करत आहेत. यज्ञकुंडाच्या समोरही अग्नी पेटत असून समोर वधू-वर बसलेले दिसत आहे. दरम्यान, इतर काही महिलाही वधूच्या मागे दिसत आहेत. (अधिक वाचा - Earn Money: घराचे छत, टेरेस खाली असेल तर करा लाखोंची कमाई, आजच करा हे काम)
वधू-वर इतक्या जवळ आले की...
वधूच्या मागे असणाऱ्या स्त्रिया वधूच्या गळ्यात किंवा साडीच्या वरच्या भागात काहीतरी करताना दिसतात. हे पाहून शेजारी बसलेली व्यक्ती हात शेअर करू लागते. वधू-वराला असे करताना पाहते तेव्हा तिला आनंद होतो. यादरम्यान दोघेही इतके जवळ आले की लवकरच दोघे रोमँटिक झाले. मग वधूने वराचे चूंबन घेण्यासाठी स्वत: ला पुढाकार घेतला आणि मग वरानेही तेच केले.
दोघांना किस करताना पाहून तिथे उपस्थित लोकही हसू लागले. यावेळी वधू-वरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. ही अगदी सामान्य गोष्ट होती, पण त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स त्यावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहे.