रांची : सध्या सर्वत्र लग्न सराई सुरू आहे. अशात अनेक लग्नातील अनेक  किस्से  ऐकायला मिळतात. कधी नवरा मुलगा भर मंडपातून पळून जातो, तर कधी नवरी  मुलगी सगळी तयारी झाल्यानंतर पळून जाते. अखेर लग्न मोडल्याने वऱ्हाडी मंडळी माघारी निघून गेले. अशीच  एक घटना घडली आहे झारखंडच्या रांचीमध्ये. नवरा  मुलगा मोठ्या थाटत लग्न मंडपात  दाखल झाला. त्यानंतर लग्नाच्या काही विधी पूर्ण देखील झाल्या. सप्तपदी झाल्या कुंकू भरण्याची वेळ येताचं नवरी भरमंडपातून पळून गेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरी मुलीच्या या वागणुकीनंतर परिसरात एकचं खळबळ माजली. नवरी मंडपातून उठून गेली आणि त्यानंतर लोकांनी मुलीने असं का केलं?  याचं कारण विचारलं आणि लग्नासाठी झालेला खर्च मुलीच्या कुटुंबाकडून मागितला. जमलेल्या लोकांनी तिला वारंवार स्वतःचा निर्णय मागे घेण्यासाठी सांगितलं पण त्या मुलीने कोणाचंही ऐकलं नाही. 


नवऱ्या मुलाने देखील मुलीला निर्णय बदलण्यास सांगितलं पण तरी देखील तिने लग्न करण्यास नकार दिला. मुलीच्या आई-वडिलांनी सांगितले की मुलीला लग्न करायचं नाही. कारण तिला मुलगा पसंत नाही. या प्रकरणानंतर आता मुलाचे कुटुंब लग्नासाठी खर्च झालेला खर्च मागत आहेत. तर मुलीच्या कुटुंबाने आमच्याकडे आता पैसे नाहीत असं सांगितलं आहे.