मुंबई: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ वेगानं व्हायरल होत असतात. कधी मजेशीर असतात तर कधी मनाला चटका लावून जातात. सध्या लग्नातील व्हिडीओ ट्रेन्ड होत आहेत. अगदी एखादा डान्स असो किंवा लग्नातील मजामस्करीचा व्हिडीओ असो सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे. आपलं लग्न धूमधडाक्यात आणि आपल्या मनासारखं व्हावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नववधू छान तयार होऊन लग्नाच्या मंडपात येताना तिच्या एन्ट्रीला गाणं चुकीचं वाजलं म्हणून तिने तुफान राडाच करायचा बाकी ठेवला होता. नखरेल नववधूनं चक्क तिच्या एन्ट्रीला गाणं तिच्या आवडीचं लागलं नाही म्हणून नाराज झाली. संतापलेल्या नववधूनं सगळ्यांना फैलावर घेतलं. तिचा राग शांत करण्यासाठी आजूबाजूच्यांनी प्रयत्न केला. मात्र नववधून चांगलीच वैतागलेली दिसली. 



जोपर्यंत गाणं सुरू होत नाही तोपर्यंत एन्ट्री न घेण्यावर ती आली. तिच्या जिद्दीसमोर सर्वांनीच हात टेकले आणि अखेर गाणं बदलण्याची खटपट सुरू झाली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. साडे अठराहजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तिचं दु:ख मी समजू शकते असं एका युझर्सने दिलं आहे. तर अनेकांनी हा व्हिडीओ क्यूट असल्याचं म्हटलं आहे.