हायवेवर नवरीची गोळ्या घालून हत्या...
अज्ञात व्यक्तींनी एका नवरी मुलीची गोळ्या घालून हत्या केली.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मेठरमध्ये शुक्रवार २७ एप्रिलला काही अज्ञात व्यक्तींनी एका नवरी मुलीची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर नवी कार, दागिने आणि २.५ लाख रुपये घेऊन फरार झाले. हाती आलेल्या माहितीनुसार, गाजियाबादमध्ये लग्न केल्यानंतर नवरा-नवरी मुजफ्फरनगरला परतले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. त्यानंतर कुटंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
या घटनेची तक्रार केल्यानंतर एसएसपीसहित अन्य पोलीस ऑफर्स घटनास्थळी दाखल झाले.
वरात मुजफ्फरनगरला येत होती
हाती आलेल्या माहितीनुसार, वरात दादरीहून मुजफ्फरनगरला परतत होती. तेव्हाच हायवेवर दौराला भागातील मटौर गावात काही अज्ञात व्यक्तींनी नवरा-नवरीच्या गाडीला ओव्हरटेक करत त्यांची कार थांबवली. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत लूट केली. त्या गाडीत नवरा-नवरीसह अजून तीन लोक होते. बंदुकीचा धाक दाखवत नवरीचे सर्व दागिने उतरवायला लावले. त्यानंतर गाडीतून खाली उतरवून नवरीच्या डोक्यात गोळी घातली.
नवरीची हत्या
सर्व दागिने, अडीच लाख आणि कारमधील सर्वांचे मोबाईल लूटले. त्यानंतर सर्वांना गाडीत उतरवत नवी कार घेऊन मुजफ्फरनगरला रवाना झाले. त्यानंतर गंभीररित्या जखमी झालेल्या नवरीला मुजफ्फरनगरमधील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांचा तपास सुरु
या घटनेची खबर मिळताच एसएसपी मंजिल सैनी, एसपी देहात राजेश कुमार सहित इतर अधिकारी आणि अन्य पोलिस घटनास्थळी दाखल झाले. एसएसपी मंजिल सैनीने सांगितले की, खूनाचा आरोप दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.