Brokerage Picks | हाय रिटर्न्स मिळवण्यासाठी ब्रोकरेज हाउसने निवडले 5 बेस्ट स्टॉक
गुंतवणूकदारांनी ब्रोकरेज हाउसच्या रिपोर्टवर नजर ठेवायला हवी.
मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कोणत्या शेअरमध्ये करावी याबाबत अनेक गुंतवणूकदार संभ्रमात असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी ब्रोकरेज हाउसच्या रिपोर्टवर नजर ठेवायला हवी. ब्रोकरेज हाउस रिसर्च आणि ऍनेलिसिस करून एखाद्या स्टॉकबाबत कॉल देतात. अशाच काही ब्रोकरेज हाउसने आपल्या संशोधनातून निवडलेल्या काही शेअर्सची नवीन लिस्ट दिली आहे. या शेअर्समध्ये Bharti Airtel, VOLTAS, Marico, Gujarat Gas, Nazara Technologies यांचा सामावेश आहे.
Bharti Airtel
Bhart Airtel मध्ये ब्रोकरेज हाउस जेफरीजने खरेदी करण्याचा सल्ला दिली आहे. शेअरसाठी ब्रोकरेजने 685 रुपयांचे लक्ष ठेवले. ब्रोकरेज हाउसचे म्हणणे आहे की कंपनीने कॅपेसिट एक्सपेंशनसाठी फंड उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
VOLTAS
VOLTASवर देखील ब्रोकरेज हाउस जेफरीजने खरेदीचा सल्ला दिला आहे. शेअरसाठी 1200 रुपयांचे लक्ष ठेवले आहे. बुधवारी शेअर 960 रुपयांवर बंद झाला होता. येत्या वर्षात कंपनीची ग्रोथ 2-5 टक्कांनी वाढण्याचा अंदाज आहे.
Marico
ब्रोकरेज हाउस जेपी मॉर्गनने एफएसीजी कंपनी मॅरिकोच्या स्टॉकला ओवर रेटिंग दिली आहे. या शेअरसाठी 600 रुपयांचे लक्ष ठेवण्यात आले आहे. बुधवारी ही शेअर 512 रुपयांवर बंद झाला होता.
Gujarat Gas
गुजरात गॅसवर ब्रोकरेज हाउस मॉर्गन स्टॅनली बुलिश आहेत. या ब्रोकरेज हाउसने शेअरची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी 733 रुपयांचे लक्ष ठेवण्यात आले आहे. गॅसच्या कंमती वाढल्याचा परिणाम कंपनीला फायदा होण्याची शक्यता आहे.
Nazara Technologies
ब्रोकरेज हाऊस जेफरीज यांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. या शेअर साठी 2070 रुपयांचे लक्ष ठेवले आहे.