मुंबई : शेअर बाजार सध्या आपल्या हाय वॅल्युएशनवर आहे. मंगळवारी निफ्टी पहिल्यांदा 18 हजारच्या पुढे बंद झाला. बाजाराच्या या हाय वॅल्युएशनमध्ये बरेच शेअर महागड्या वॅल्युएशनवर ट्रेड करीत आहेत. पुढे बाजारात मोठी उतार चढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक्सपर्ट निवडक क्वॉलिटी स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला देत आहेत. अशातच अनेक शेअर्सच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ब्रोकरेज हाऊसेसने कामाचा सल्ला दिला आहे. Tata Motors, Jubilant Food Works आणि Container Corporation of India या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा एक्सपर्ट्सने सल्ला दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Tata Motors
टाटा मोटर्समध्ये ब्रोकरेज हाऊस नोमुराने खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 547 रुपयांचे लक्ष निश्चित केले आहे. ब्रोकरेज हाऊस जेफरीजने शेअर्ससाठी आपले टार्गेट 565 रुपये ठेवले आहे. ब्रोकरेज हाऊस HSBC ने टाटाच्या शेअर्ससाठी 550 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. 


टाटा मोटार्सच्या इलेक्ट्रिक व्हेहिकल व्यवसायात TPG RISE Climate तर्फे साधारण 7500 कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे कंपनीच्या इलेक्ट्रिक व्हेहिकल प्लानला मोठे बुस्ट मिळू शकते. 


Jubilant Food Works
ज्युबिलन्ट फुड वर्क्समध्ये ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीने खरेदीचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी  5000 रुपयांचे टार्गेट निश्चित केले आहे. सध्या या शेअरची किंमत 4320 रुपयांच्या आसपास सुरू आहे.


Container Corporation
Container Corporation मध्ये ब्रोकरेज हाऊस जेफरिजने खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने शेअर्ससाठी 870 रुपयांचे टार्गेट निश्चित केले आहे. शेअरची सध्याची किंमत 705 रुपये आहे.