Crime News : ज्या बहिणीने हातात राखी बांधली असावी. त्याच नात्याला भावाने कलंकित केले आहे. भावाने आपल्या बहिणीला वाईट नजरेपासून वाचवायचे असते. पण त्याने आपल्याच वासनेची तिला शिकार बनवले. ही घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरीशी संबंधित आहे. जिथे चुलत भावाने बहिणीवर बलात्कार केला. ती गरोदर राहिल्यावर तिचा जीवही घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाने तीन महिन्यांपूर्वी माझ्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप मृत मुलीच्या आईने केला आहे. तसेच, कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर ती गरोदर राहिली. याबाबत मुलीच्या आईने तिला विचारले असता तिने सर्व प्रकार आईला सांगितला. यानंतर मुलीच्या आईने तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पण आरोपी पक्षाने पंचायत बोलवून त्यावर तोडगा काढला. मुलीचा गर्भपात केला जाईल, त्यानंतर तिचे लग्न होईल, असा करार होता. आरोपीचे कुटुंब सर्व खर्च उचलणार होते.


6 ऑक्टोबर रोजी आरोपीची आई मुलीला सोबत घेऊन गेली. यानंतर तिने असे केले जे ऐकून धक्का बसेल. आरोपीच्या आईने तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले. गर्भवती मुलगी गंभीररीत्या भाजली. तिला रुग्णालयात आणण्यात आले पण उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला


दुसरीकडे तिच्या आईने मुलीला न्याय मिळवून देण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी, तिची आई आणि बहिणीविरुद्ध कलम ३०७, ३७६ आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि त्याच्या आईला पोलिसांनी तुरुंगात पाठवले आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू आहे.