13 वर्षांच्या बहिणीला शिकवण्यासाठी गावावरुन शहरात आणले भावाने, वहिनीने `या` कारणाने अंगावर दिले चटके
Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी घटना राजस्थानच्या उदयपूरमध्ये समोर आली आहे. एका 13 वर्षीय निष्पाप मुलीवर वहिनीने गरम चाकूने अंगावर चटके दिले.
जयपूर : Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी घटना राजस्थानच्या उदयपूरमध्ये समोर आली आहे. एका 13 वर्षीय निष्पाप मुलीवर वहिनीने गरम चाकूने अंगावर चटके दिले. या प्रकरणात, भाऊ देखील गप्प राहिला आणि पत्नीच्या भीतीमुळे बहिणीला मदत करू शकला नाही. भावाने आपल्या बहिणीला बिहारमधून शिकवण्यासाठी राजस्थानमध्ये आणले होते, मात्र येथे अभ्यास करण्याऐवजी तिच्यावर अत्याचार होऊ लागले.
मुलीला शिकवण्यासाठी आणले होते..
बिहारमधील एका 13 वर्षांच्या निष्पाप मुलीला तिच्या चुलत भावाने राजस्थानच्या उदयपूर येथे शिकवण्यासाठी आणले होते. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण नंतर सगळं बदलंत गेलं. शिकवण्याऐवजी घरकामाला जुंपले. काही वेळाने वहिनी आपले रूप दाखवू लागली आणि मुलीला शिकवण्याऐवजी ती घरातील कामात गुंतवू लागली. चूक झाली की बेदम मारहाण करायची. त्यानंतर उलट तिला गरम चाकूने चटके देत तिच्यावर अत्याचार केले गेलेत. त्यामुळे तिचे शिक्षण बाजुलाच राहिले आणि तिला अत्याचार सहन करावे लागले.
अंगावर गरम चाकूचे दिले चटके
एके दिवशी कशाचा तरी राग आल्याने वहिनीने 13 वर्षांच्या निष्पाप मुलीला मारहाण केली. त्यानंतर गरम चाकूने अंगावर चटके दिले. पत्नीच्या भीतीने भाऊ निष्पाप बहिणीला मदतही करू शकला नाही.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शिक्षणासाठी आणलेल्या अल्पवयीन मुलीला शिक्षण मिळण्याऐवजी तिच्यावर अत्याचार होत असल्याची माहिती एका सामाजिक संस्थेला मिळाली. त्यानंतर CWC टीमने मुलीची सुटका केली. याप्रकरणी सविना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता मुलीला बिहारमध्ये तिच्या पालकांकडे परत जायचे आहे.