Crime News Today In Marathi: दिरानेच वहिनीशी लग्न केले मात्र त्याच्या कुटुंबीयांना मात्र त्याचा हा निर्णय पटला नाही. लग्नानंतर दोघेही नेपाळला राहण्यासाठी गेले त्यानंतर गावात परत येताच असं काही घडलं की तरुणाने जीवच गमावला. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैशाली गावात एका ठिकाणी झाडाला लटकलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह सापडला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांची गर्दी जमली सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव राम प्रवेश कुमार महतो असं आहे. 


राम प्रवेशचे लग्न आठ वर्षांपूर्वी मुजफ्फरपूर जिल्ह्यातील नीतु देवी हिच्याशी झालं होतं. नीतु देवी हि त्याच्याच दिवंगत भावाची पत्नी होती. विधवा वहिनीसोबत लग्न केल्याने त्याचे कुटुंबीय नाराज होते. लग्नानंतर तो त्याच्या पत्नीसह नेपाळला राहत होता. दोन दिवसांपूर्वीच तो त्याच्या मुळ गावी परतला होता. 


राम प्रवेश हा नेपाळमध्ये काम करुन कुटुंबाला सांभाळत होता. त्याला दोन मुलंदेखील आहेत. त्याची पत्नी सध्या माहेरी राहत आहे. तर, तो नेपाळहून त्याच्या घरी आला होता. रामप्रवेशची हत्या ही त्याच्यात कुटुंबीयांनी केली असा आरोप करण्यात येत आहे. कुटुंबीयांच्या मनाविरुद्ध लग्न केल्यामुळं त्याची हत्या केली असा दावा करण्यात येत आहे. 


रामप्रवेशचे सासरे राजकिशोर सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रामप्रवेशच्या भावाने त्याची हत्या केली त्यानंतर कारमध्ये त्याचा मृतदेह टाकून झाडाला लटकवला. माझ्या जावयाची हत्या त्याच्याच घरच्यांनी केली, असा आरोप त्यांनी केला आहे. तर, राम प्रवेशच्या घरच्यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. राम हा त्याच्या सासरीच राहत होता. त्यांनी स्वतःच गळफास लावत आत्महत्या केली आहे. 


पोलिस या प्रकरणाचा दोन्ही बाजूने तपास करत आहेत. काही लोकांकडून चौकशीदेखील करण्यात येत आहे. लवकरच या प्रकरणात कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.