भावाच्या लग्नात बहिणीचा मनसोक्त डान्स 18 लाखाहून अधिकांनी पाहीला
मुंबई : भावाचं लग्न म्हणजे बहिणासाठी मोठा आनंदाचा क्षण असतो. अशावेळी तिच्या आनंदाला पारावर उरलेला नसतो. सर्वांना निमंत्रण देण्यापासून भावाची तयारी करण्यापासून सर्वच काम तिला करायची असते. लग्नात भावासाठी सरप्राईज देण्याचा ट्रेण्डही सध्या वाढतोय. अशाच एका बहिणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोयं.
लग्न हे आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. इथं दोन मनं जुळण्यासोबत दोन परिवारही एकत्र येत असतात. आपल्या देशात अनेक अशा परंपरा आहेत ज्या लग्न समारंभात जपल्या जातात. नृत्य हा त्यातलाच एक प्रकार म्हणावा लागेल. आनंद द्विगुणित करण्यासाठी घरगुती समारंभातही नृत्य पाहायला मिळत.
लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस
अशाच आठवणी सुंदर करण्यासाठी एका बहिणीने भावाच्या लग्नात मन भरून नृत्य केलंय जे सध्या लाखोंच्या पसंतीस पडलंय. हा व्हिडिओ कुठे शूट झालाय ? ती मुलगी कोण ? याबद्दल माहिती समोर आली नाहीयं. पण आतापर्यंत 18 लाखाहून जास्त जणांनी हा व्हिडिओ पाहिलायं. व्हिडिओ खाली लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.