जम्मू : बुधवारी जम्मू-काश्मीरच्या सीमेपलीकडून पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. भारतीय जवांनांनी याचा बदला घेतलाय. एकाच्या बदल्यात भारताच्या जवानांनी पाकिस्तानी सैन्याचे पाच सैनिक ठार केलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी सांबा सेक्टरमध्ये बीसएफच्या जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी सैन्याचे दहा सैनिक ठाक केले. याशिवाय सीमेपलीकडील पाकिस्तानच्या चार चौक्याही उद्ध्वस्त केल्या. 


बुधवारी एक जवान झाला होता शहीद


जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बुधवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. पाकिस्तानच्या सीमेपलीकडून गोळीबार सुरुच आहे. भारतीय जवान या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देतायत.


बीएसएफच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसफ जवानांनी बुधवारी ४ पाकिस्तानी मॉर्टरच्या ठिकाणांची माहिती मिळवत ते तळ उद्ध्वस्त केले. 


जन्मदिवशीच जवान शहीद


पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल आरपी हाजरा शहीद झाले होते. बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात हाजरा गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.