श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानने पून्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पाक सैन्याने केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. शुक्रवारी सकाळी पाकिस्तानकडून आर एस पुरा सेक्टरमधील अरनिया क्षेत्रात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे तर, एक स्थानिक नागरिक जखमी झाला आहे.


पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफचे बृजेंद्र बहादुर सिंह हे शहीद झाले.



यापूर्वी बुधवारी जम्मूतील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. अखनूरमधील ब्राह्मन बेला आणि रायपूर बॉर्डर पोस्टवर पाकने गोळीबार केला होता. या गोळीबारात २ बीएसएफचे जवान आणि ३ स्थानिक नागरिक जखमी झाले होते.