एयरटेल, जियोला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलचा नवा प्लॅन !
सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरु आहे. दर दिवशी कंपनी नवनवे प्लॅन्स सादर करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते.
नवी दिल्ली : सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरु आहे. दर दिवशी कंपनी नवनवे प्लॅन्स सादर करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. आता बीएसएनएलनेही या स्पर्धेत उडी घेतली आहे. बीएसएनएलने जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी नवीन प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये ५६ दिवसांपर्यंत अमर्यादित इंटरनेट सेवा आणि व्हॉइस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. तसंच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा देण्यात येत आहे.
दररोज १ जीबी हायस्पीड इंटरनेटही देण्यात येईल. १ जीबी संपल्यानंतर देखील इंटरनेटचा आनंद घेता येईल फक्त त्याचा वेग कमी होईल. त्याचा वेग १२८ kbps इतका असेल. बीएसएनएल शिवाय इतर कंपन्यांचे प्लॅन :
एअरटेल ३४५: या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविध आहे. त्याचबरोबर दररोज १ जीबी हायस्पीड डाटा मिळेल. हायस्पीड डाटाची मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट बंद होईल. आणि हा प्लॅन २८ दिवसांपर्यंत व्हॅलिड असेल.
जिओ ३०९: या प्लॅनमध्ये अमर्यादित इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर अमर्यादित मेसेजेस देखील करता येतील. या प्लॅनची व्हॅलिडिटी ५६ दिवसांची असून रोज १ जीबी हायस्पीड इंटरनेट डाटा मिळेल. दिवसभराची मर्यादा संपल्यानंतर देखील इंटरनेट सुरू राहील. पण त्याचा वेग कमी होऊन १२८ kbps स्पीड मिळेल.