नवी दिल्ली : मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजप दरम्यान जोरदार चुरस सुरू आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या कलांप्रमाणे अजूनही कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. अशावेळी सत्तेची चावी सपा-बसपासारख्या छोट्या पक्षांच्या हाती आलीय... हे पक्ष आता 'किंगमेकर्स'ची भूमिका निभावणार आहेत. त्यांच्या समर्थनाशिवाय कोणताही पक्ष आपलं सरकार स्थापन करू शकणार नाही. याच दरम्यान काँग्रेसनं सपा-बसपाकडे सरकार स्थापन करण्यासाठी समर्थनाची मागणी केलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सपा-बसपाच्या संपर्कात आहेत. याच दरम्यान मायावती यांनी आपल्या विजयी उमेदवारांना दिल्लीत पाचारण केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी सपा-बसपा यांच्यात चर्चा सुरू आहे. याबद्दल दोन्ही पक्ष एकत्र निर्णय घेणार आहेत. मध्य प्रदेशात बीएसपी ४, समाजवादी पक्ष १ आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाला २ जागांवर आघाडी मिळालीय. 


दुसरीकडे, सूत्रांच्या माहितीनुसार सपा-बसपा आणि जीजीपीनं बाजपाला समर्थन देण्यासाठी नकार दिलाय. अशावेळी हे पक्ष काँग्रेसला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे.