बसपाचे आमदार गेहलोत यांच्याविरोधात मतदान करतील, कॉंग्रेसला धडा शिकवणार : मायावती
काँग्रेसला धडा शिकविण्याची भाषा बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायवती यांनी केली आहे.
लखनऊ : काँग्रेसला धडा शिकविण्याची भाषा बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायवती यांनी केली आहे. त्यांनी पत्रकार परिषद देत राजस्थानमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारला बसपा पाठिंबा देणार नाही, असे मायावती यांनी स्पष्ट केले आहे. गेहलोत यांनी बसपाच्या आमदारांचे त्यांच्या पक्षात विलिनीकरण केले आहे, असा थेट आरोप करत आम्ही काँग्रेसविरोधात न्यायालयात जाऊ, असा इशारा दिला आहे.
मायावती यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. राजस्थान निवडणुकीत कॉंग्रेसने बसपाच्या आमदारांना आपल्या आमदारांना पक्षात घेतले आहे. हे गेहलोत यांनी चांगले केलेले नाही. राजस्थानमधील निवडणुकांनंतर बसपाने कॉंग्रेसला पाठिंबा दर्शविला, परंतु गहलोत जी यांनी असंवैधानिकपणे बसपाचे सर्व आमदार कॉंग्रेसमध्ये विलीन केले. त्याआधीही त्यांनी हे केले होते आणि म्हणूनच व्हीप बजावण्यात आला. बसपाचे आमदार कॉंग्रेसविरोधात मतदान करतील कारण गेहलोत यांनी वारंवार बसपाच्या आमदारांचे चुकीच्या पद्धतीने त्यांच्या पक्षात विलीनीकरण केले आहे, असे त्या म्हणाल्यात.
कॉंग्रेसमुळे आम्हाला कोर्टात जावे लागले होते आणि बसपा योग्य वेळेची वाट पाहत होती. यावेळी आम्ही या प्रकरणी शांत बसणार नाही. सर्वोच्च न्यायालयात हा विषय नेणार आहोत. कॉंग्रेसला धडा शिकण्याची गरज आहे, असे मायावती यांनी सांगितले.
कॉंग्रेस ज्याला आज चोरी म्हणून संबोधत आहे तेच काम कॉंग्रेसने बसपाबरोबर केले होते. आज चोरीचा माल चोरीला गेला तेव्हा कॉंग्रेस आवाज काढत आहे.
दरम्यान, कोरोनाबाबत त्या म्हणाल्या, "कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी केंद्राने योग्य ती पावले उचलली पाहिजेत. आम्हाला प्रभावी काम दिसून येत नाही. योग्य पावले उचलेली दिसत नाहीत. जेव्हा केंद्र अनलॉक तीन जाहीर करेल त्यावेळी जे धोरण तयार केले जाईल ते सर्व राज्यात लागू होते.