नवी दिल्ली : अर्थमंत्री अरूण जेटली हे भाजप सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. तसेच पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पातून शेतकरी, तरूण आणि सर्वसामान्यांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरूणांना आणि शेतक-यांना या अर्थसंकल्पातून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेऊया..


तरूणांना काय हवंय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एज्युकेशन लोनमध्ये दिलासा


विद्यार्थ्यांना लोन घेणे सोपे व्हावे


एज्युकेशन लोनवरील व्याद दरातील अंतर संपावे


स्किल डेव्हलपमेंट, रोजगारची गॅरन्टीवर फोकस


सरकारी विभागांमध्ये व्हावी नवीन भरती


रोजगार आणि स्टार्टअपमध्ये फायदा मिळावा


आर्थिक रूपाने कमजोर विद्यार्थ्यांना मदत मिळावी


खेळाशी संबंधीत वस्तू स्वस्त व्हाव्या


शेतक-यांना काय हवंय?


मोफत विज कनेक्शन मिळावं


सिंचाईसाठी विज बील दरात दिलासा मिळावा


पिक विमा रक्कम वाढवली जावी


शेतक-यांच्या पिकाला योग्य दर मिळावे


शेतक-यांनाही पिकाच्या किंमती ठरवण्याची संधी मिळावी


शेतीतील गुंतवणुकीला चालना मिळावी


कृषी उत्पन्नांवर टॅक्स लावला जाऊ नये


कोल्ड स्टोरेज तयार करण्यासाठी सब्सिडी मिळावी


कृषी क्षेत्रावर फोकस


या अर्थसंकल्पातून शेतक-यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण पुढील वर्षी लोकसभा निवडणुका आहेत. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.


रोजगार वाढवण्यावर जोर


अर्थसंकल्पात रोजगार वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. रोजगार निर्मिती, स्किल डेव्हलपमेंट अशा गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं जाण्याची शक्यता आहे.