नवी दिल्‍ली : अर्थमंत्री अरुण जेटली हे सध्या अर्थसंकल्प सादर करीत आहेत. त्यांनी त्यांच्या सुरवातीच्या भाषणात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार भारताला सर्वात वेगवान अर्थव्यवस्था बनवत आहे. सरकारचा प्रयत्न आहे की, शेतक-यांचं उत्पन्न वाढवं आणि तरूणांना रोजगार मिळावा. त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे...


जेटलींच्या भाषणातील ठळक मुद्दे -


- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अनेक मौलिक सुधारणा झाल्या आहेत. 
- मोदी सरकारच्या योजनांमुळे परदेशी गुंतवणूक वाढली आहे. 
- देशातील तरूण आज इमानदारीने जगत आहे. 
- गरिबी दूर करण्यासाठी भारत मजबूत करणार
- भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
- सरकारच्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेमध्ये वेग, आम्ही जीएसटीत अनेक सुधारणा केल्यात
- आमचं सरकार मध्यम वर्गाच्या लोकांचं जगणं सोपं करत आहे. 
- सौभाग्य योजनामुळे ४ कोटी घरात वीज पोहोचली आहे. 
- आम्ही लोकांना होम लोनमध्ये मोठा दिलासा दिला आहे. 
- कृषी उत्पादन रेकॉर्ड ब्रेक होत आहे.