अर्थसंकल्प २०१८ : काय महागलं ?
कोणत्या गोष्टी महागल्या याकडे एक नजर टाकूया.
नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये मध्यमवर्गाला सरकारचा दणका बसलेला दिसून येत आहे. कोणत्या गोष्टी महागल्या याकडे एक नजर टाकूया.
काय महागल ?
-मोबाईल आणि टीव्ही महागणार
- म्युचअल फंडावरील गुंतवणुकीवरही टॅक्स लागणार
- इम्पोर्टेड मोबाईल, टीव्ही महागणार
-मोबाईलवर कस्टम ड्युटी वाढणार
- प्रत्येक बिलावरील टॅक्स वाढणार
- शिक्षण अधिभार ३ टक्क्यावरून ४ टक्के
अर्थसंकल्प २०१८ : देशातील खासदारांना दिलासा देणारा निर्णय
नोकदरांची निराशा
अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते.
मात्र सरकारने टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे नोकदरांची निराशा झाली आहे.
करदात्यांची संख्या २.१ टक्क्यांनी वाढली आहे. तरीही टॅक्सची चोरी होत आहे. अशात जेटलींनी कॉर्पोरेटच्या टॅक्समध्ये मोठी सूट दिली आहे.
कार्पोरेट कंपन्याना मोठा दिलासा देण्यात आला आहे. २५० कोटींच्या टर्नओव्हरवर २५ टक्के टॅक्स लागणार आहे.
कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोकरदारांना वैद्यकीय परताव्यासाठी अतिरीक्त ४० हजारांची सवलत मिळणार आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही.