रेल्वे बजेट 2019 : रेल्वेसाठी 64 हजार 587 कोटींची तरतूद
रेल्वेवर एक लाख कोटींपेक्षा अधिक खर्च करण्याची घोषणा
बजेट 2019, नवी दिल्ली : अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी बजेट सादर करताना रेल्वेसाठी 64 हजार 587 कोटींची तरतूद केली आहे. रेल्वेवर एक लाख कोटींपेक्षा अधिक खर्च करण्याची घोषणा लोकसभेत केली. अर्थमंत्री यांनी म्हटलं की, 'वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून देशातील वर्ल्ड क्लास रेल्वेची सुविधा दिली जाणार आहे. संपूर्णपणे भारतीय इंजिनियर्सने ही रेल्वे तयार केली आहे. भारतीय रेल्वेसाठी हे सर्वात सुरक्षित वर्ष होतं. आता देशात एकही मानवरहित क्रॉसिंग नाही आहे. त्यांनी म्हटलं की, भारत इंटरनॅशनल सोलर अलायंसचा सदस्य बनला आहे. जी खूप मोठी गोष्ट आहे.'