Budget 2019: लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक
लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचा मोठा दिलासा
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारने शेवटचं बजेट सादर केलं. यामध्ये मध्यम वर्गाच्या लोकांना मोठा दिलासा देण्यात आला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी इनकम टॅक्समध्ये सूट, टॅक्समध्ये घट, पेंशन, प्रोविडंट फंड आणि विमा यांची घोषणा केली. सरकारच्या या बजेटमुळे देशातील जवळपास 3 कोटी टॅक्स भरणाऱ्य़ा लोकांना याचा फायदा होणार आहे. भाजपला देखील आगामी निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार आहे.
मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक
हे बजेट मोदी सरकारसाठी मास्टर स्ट्रोक ठरणार आहे. मध्यम वर्ग हा भारतीय जनता पक्षाचा समर्थक मानला जातो. टॅक्ससह इतर गोष्टीमध्ये दिलेल्या सूटमुळे नोकरी करणारा वर्ग हा मोदी सरकारवर खूश झाला आहे. विशेष करुन 25 ते 40 वर्षाच्या मधील मतदारांवर याचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे. भारतामध्ये सर्वाधिक याच वयातील मतदार आहेत. त्यामुळे मोदी सरकारसाठी हे बजेट फायद्याचं ठरणार आहे.
मध्यम वर्गासाठी अनेक घोषणा
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी घोषणा केली की, पाच लाखापर्यंत आता कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. जर यामध्ये गुंतवणूक धरली तर वर्षाला साडेसहा लाखावर सूट मिळणार आहे. फिक्स डिपॉझिटवर देखील सरकाने सूट दिली आहे. देशात फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक लोकं भविष्याच्या दृष्टीकोनातून बचत करणं पसंत करतात. त्यामुळे एफडीवर मिळणारे 40 हजारांपर्यंतच व्याज करमुक्त करण्यात आलं आहे. याआधी 10 हजारापर्यंतची सूट होती.