नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणात महत्वाची घोषणा केली. भारतात रेल्वे, मेट्रो आणि स्थानिक महामंडळ तसेच कॉर्पोरेशनच्या बसने प्रवास करण्यासाठी, एकच कार्ड वापरता येणार आहे. या कार्डचं नाव नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्ड (NTC) ठेवण्यात येणार आहे. एनटीसीला रूपे कार्डच्या मदतीनं चालवलं जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्डच्या माध्यमातून बसचं तिकीट, पार्किंगचा खर्च, रेल्वे तिकीट सर्वांचे पैसे एकाच कार्डने देता येणार आहेत. एनटीसीला रूपे कार्डच्या मदतीनं चालवता येणार आहे. या कार्डच्या माध्यमातून रेल्वे तिकीट तसेच बहुतांश ठिकाणी पार्किंगचे देखील पैसे देता येणार आहेत. 


तसेच भारतमाला या महत्वाकांक्षी योजनेने रस्ते वाहतूक मजबूत करण्यावरही जोर दिला जाणार आहे, तर दुसरीकडे सागरमाला योजनेनुसार जलवाहतूक वाढल्याने, बंदरं अधिक सक्षम होतील. तसेच उडान योजनेमुळे हवाई इंफ्रास्ट्रक्चरमध्ये मजबूती येणार आहे, आणि शहरी तसेच ग्रामीण अंतर कमी होणार आहे.


यासह प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेनुसार 1.25 लाख किलो मीटर रस्ता बनवण्यात येईल. यात जवळ जवळ 80,200 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे.