नवी दिल्ली : Budget2020 सादर करण्यासाठी शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमरास Finance minister Nirmala Sitharaman केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत आल्या. सकाळी अकरा वाजण्य़ाच्या सुमारास मंत्रीमंडळ आणि संसदेच्या सर्व सदस्यांसमोर त्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने सीतारामन यांनी हा विक्रमी अर्थसंकल्प उलगडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाच्या आकांक्षा, आर्थिक विकास आणि सामाजिक जपणूक हे तीन मुख्य घटक डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. 


विविध योजना, प्रस्ताव आणि घोषणा करत सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. यंदाच्या वर्षीसुद्धा त्यांनी 'वही खातं' स्वरुपात अर्थसंकल्प संसदेत आणला. रेल्वे क्षेत्र, विविध योजना, नोकरदार वर्गासाठीची करप्रणाली, देशाची विकासाच्या दिशने वाटचाल हे सर्व मुद्दे अधोरेखित करत हा अर्थसंकल्प सीतारामन यांनी सादर केला. 


वाचा : Budget 2020 : भारतीय रेल्वेवर नव्या संकल्पांचा वर्षाव 


सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प सादर करण्यासाठी तब्बल २ तास आणि ४५ मिनिटं इतका वेळ घेतला. मागील वर्षी त्यांनी सीतारामन यांनी दोन तास १७ मिनिटे इतक्या वेळात अर्थसंकल्प सादर केला होता. मागील वर्षीच सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेमध्ये माजी अर्थमंत्री जसवंत सिंग यांना मागे टाकलं होतं. या दोघांच्याही वेळेत दोन मिनिटांचा फरक होता. 



जसवंत सिंग यांनी २००३मध्ये अर्थसंकल्प सादर करतेवेळी २ तास १३ मिनिटांचा वेळ घेतला होता. जास्तीत जास्त वेळ घेत संसदेत अर्थसंकल्पीय भाषण देणाऱ्यांमध्ये अरुण जेटली, प्रणव मुखर्जी  आणि पी. चिदंबरम यांच्याही नावांचा समावेश आहे. सर्वात मोठ्या अर्थसंकल्पाविषयी सांगावं तर, डॉ. मनमोहन सिंग यांनी १९९१मध्ये तब्बल १८,६५० शब्दांचा विक्रमी अर्थसंकल्प सादर केला होता.