मुंबई : Budget 2020 सादर होत असतानाच साऱ्या देशात या अर्थसंकल्पाविषयीचं कमालीचं कुतूहल पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य नोकरदार वर्गापासून ते धनाढ्य व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच अर्थमंत्री यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पातून काय नवं सादर करणार, हेच जाणून घेण्यास सारे आतुर आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाची सातत्याने बदलणारी अर्थव्यवस्था, विविध गटांतील नोकरदार वर्ग, व्यावसायिक अशा सर्व गोष्टींची सांगड घालत अर्थव्यवस्थेचा हाच आलेख न डगमगता त्यामध्ये किमान समतोल राखत आव्हानात्मक परिस्थितीतही सुवर्णमध्य साधण्याचं कसब अर्थमंत्री आजमवणार का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या अर्थसंकल्पाची सर्वत्र चर्चा सुरु आहे, येत्या काळात देशाचा आर्थिक विकास ज्या अर्थसंकल्पावर आधारित आहे, तो सर्वप्रथम कधी सादर करण्यात आलेला माहितीये? चला तर, मग जाणून घेऊया अर्थसंकल्पाविषयीच्या अशाच काही रंजक गोष्टी.... 


भारतीय अर्थव्यवस्था सुस्त पण.... Budget 2020 पूर्वी IMF चे महत्त्वपूर्ण वक्तव्य


*देशाचा पहिला Budget अर्थसंकल्प ७ एप्रिल १८६०ला सादर करण्यात आला होता. 


*ब्रिटीश सरकारचे अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी हा पहिलावहिला अर्थसंकल्प सादर केला होता. 


*स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ला सादर करण्यात आला होता. 


*देशाचे पहिले Finance minister अर्थमंत्री आर.के. षणमुखम चेट्टी यांनी हा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. 


*यापूर्वी अर्थसंकल्पाच्या छपाईचं काम राष्ट्रपती भवनातच होत असे. 


*१९५०ला अर्थसंकप्तालीत माहिती बाहेर कळण्याची घटना घटल्यानंतर छपाईची जागा बदलण्यात आली. 



*राष्ट्रपती भवनानंतर छपाईचं काम हे सुरक्षित छपाईखान्यात होऊ लागलं होतं. 


*१९८०पासून अर्थसंकल्पाच्या छपाईचं काम अर्थमंत्रालयाताच केलं जाऊ लागलं. 


*प्रथमत: अर्थसंकल्प फक्त इंग्रजीतूनच छापला जात असे. 


*१९५५-५६पासून अर्थसंकल्प हिंदी भाषेतही छापला जाऊ लागला.