अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर परिणाम, दिग्गज गुंतवणूकदारांची `या` सेक्टरवर नजर
Budget 2022 Share market अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत विकास, इलेक्ट्रिक वाहन यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणावर घरे बांधणे, नळ-पाणी योजना आदींसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. अनेक क्षेत्रातील कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. हे असे काही शेअर्स आहेत,
मुंबई : Budget 2022 Share market : अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत विकास, इलेक्ट्रिक वाहन यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणावर घरे बांधणे, नळ-पाणी योजना आदींसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. अनेक क्षेत्रातील कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. हे असे काही शेअर्स आहेत, जे येत्या काळात मोठी कमाई करू शकतात.
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामण (FM Nirmala Sitharaman) यांनी आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सरकारने पायाभूत सुविधा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना, नल-जल योजना, डिजिटल चलन, क्रिप्टोकरन्सीवर कर अशा अनेक महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या. याशिवाय अनेक क्षेत्रांना अर्थसंकल्पातून दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. जे घडलेले नाही. तरी या अर्थसंकल्पातून ज्या क्षेत्रांना बूस्ट मिळेल त्या क्षेत्रांवर गुतंवणूकदारांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
अर्थसंकल्पातही या क्षेत्रांवर भर
अपेक्षेनुसार, सरकारने इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटवर (EV Segment) लक्ष केंद्रित केले आहे. दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे विणण्यापासून आणि शहरांमध्ये नागरी वाहतूक सुधारणे, पायाभूत सुविधा, 400 नवीन वंदे भारत गाड्या सुरू करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. सरकारने नळपाणी योजनेसाठी 60 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
EV Sector: बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेष धोरणाची चर्चा करण्यात आली आहे. लवकरच बॅटरी स्वॅपिंगचे नवीन धोरण समोर येईल. स्वच्छ वाहतुकीला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे आगामी काळात बॅटरी बनवणाऱ्या कंपन्यांना थेट फायदा होणार आहे. सरकारच्या या घोषणेमुळे एक्साइड इंडस्ट्रीज आणि अमरा राजा बॅटरिस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रगती होऊ शकते.
Infra & Transport: सरकारने दुर्गम भागात रस्ते बांधणे, शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक सेवांमध्ये सुधार करणे आणि पुढील तीन वर्षांत 400 नवीन वंदे भारत ट्रेनची घोषणा केली आहे. याचा थेट फायदा इन्फ्रा आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील शेअर्सला होऊ शकतो. या दोन क्षेत्रातील L&T, GMR इन्फ्रा, कंटेनर कॉर्पोरेशन आणि IRCTC चे शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.
Metal & Solar: सुमारे 4 कोटी घरांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी सरकारने 60 हजार कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत. याशिवाय लॉजिस्टिकवरही सरकारचे विशेष लक्ष आहे. सौर ऊर्जा क्षेत्रासाठी सुमारे 20 हजार कोटी रुपयांची PLI योजना जाहीर करण्यात आली आहे. टाटा स्टील, वेदांता, जेएसडब्ल्यू स्टील्स, किर्लोस्कर ब्रदर्स, टाटा पॉवर, अदानी एंटरप्रायझेस, रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअर्सला याचा फायदा होऊ शकतो.
Telecom: सरकारने अर्थसंकल्पात स्पष्ट केले आहे की यावर्षी 5G सुरू होणार आहे. या वर्षी स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे. देशात डेटा स्टोरेजला प्रोत्साहन देण्याचीही सरकारची योजना आहे. भारती एअरटेल, एमटीएनएल, तेजस नेटवर्क सारख्या शेअर्सना या निर्णयाचा फायदा होऊ शकतो.
Defence: संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने भारत सरकार गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर संरक्षण उपकरणे बनविण्यावर अधिक भर दिला जात आहे. अर्थसंकल्पात, अर्थमंत्र्यांनी स्थानिक कंपन्यांसाठी 68 टक्के संरक्षण भांडवल योजना आखली आहे. या घोषणेमुळे भारत फोर्ज, पारस डिफेन्स, न्यू स्पेस इंडिया सारखे शेअर्स वाढू शकतात.