Nirmala Sitaraman: अर्थमंत्री निर्मला सीतारामण येत्या काही क्षणातच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या 2023-24 मध्ये सामान्य जनतेच्या काय अपेक्षा (Budget Expectations) आहेत यांची कल्पना गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांतून आपल्या लक्षात आलेच असेलच. (Union Budget 2023 5 saree looks that nirmala sitaraman wore has a special meaning in it read the full article)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2014 साली भाजपाचे सरकार (BJP Government) आल्यानंतरचे हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे पाचवे बजेट आहे. येत्या पाच वर्षांमध्ये निर्मला सीतारामण यांच्या भाषणाची, बजेट सादर करण्याच्या पद्धतीची आणि त्यांच्या आगमनापासून ते त्यांच्या बजेट सादर करण्यापर्यंतच्या अनेक लहान-मोठ्या गोष्टींची चर्चा ही होतच असते. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे त्यासाठीही सगळ्यांचेच लक्ष वेधलेले असते. परंतु तुम्ही कधी त्यांच्या लुककडे लक्ष दिले आहे का? 


केंद्र सरकार दुसऱ्यादा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकार 2.0 चा (Modi Government 2,0) हा पाचवा अर्थसंकल्प आहे. आज बरोबर 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman Sarees) यांच्या लुकनं सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आज त्या लाल रंगाच्या (Nirmala Sitaraman Red Saree) साडीमध्ये आल्या आहेत. परंतु त्यांच्या या नव्या रंगाच्या साडीमधल्या लुकमागे एक अर्थ दडलेला आहे, तुम्हाला माहितीये का, याबद्दल... नसेल तर चला मग जाणून घेऊया या वर्षीच्या या बजेटच्या या स्पेशल लुकविषयी. 


2023 मध्ये लाल आणि काळ्या बॉर्डरची साडी - 
यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लाल आणि काळ्या बॉर्डरच्या रंगाची साडी नसली आहे. जी शौर्य आणि ताकदीचे प्रतीक आहे. 


2022 मध्ये चॉकलेटी रंगाची साडी - 
निर्मला सीतारामण यांनी मागच्या अर्थसंकल्पात चॉकलेटी रंगाची साडी नेसली होती. ज्यात सुरक्षेचा संदेश दिला आहे. 


2021 मध्ये लाल रंगाची साडी - 
निर्मला सीतारामण यांनी कोविडनंतरच्या बजेटमध्ये लाल रंगाची साडी नेसली होती. ज्यात अर्थ आहे शक्ति आणि संकल्पाचा. 


2020 मध्ये पिवळ्या रंगाची साडी - 
2020 मध्ये निर्मला सीतारामण यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. ज्यात संदेश आहे उत्साह आणि उर्जेचा. 


2019 मध्ये डार्क पिंक रंगाची साडी -
2019 मध्ये निर्मला सीतारामण यांनी डार्क पिंक रंगाची साडी नेसली होती. ज्याचा अर्थ आहे गंभीरता आणि ठहराव आहे.