Budget 2023: ग्राहकांनो ऐकले का...ऐन लग्नसराईत सोने-चांदी महागणार!
Gold Silver Price: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर देखील सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसली. त्यातच आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऐन लग्नसराईत ग्राहकांना झटका देणार बातमी दिली.
Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (1 फेब्रुवारी 2023 ) सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमध्ये कपात ही सर्वात मोठी घोषणा केली आहे. सरकारने जुनी करप्रणाली रद्द केली. त्याचदरम्यान अर्थमंत्र्यांनी काय महाग, काय स्वस्त हे देखील सांगितले आहे. यामध्ये सर्वात मोठी बातमी म्हणजे ऐन लग्नसराईत सोने-चांदी महागणार असल्याची घोषणा केली आहे.
सोन्याच्या किंमतीत चढ उतार होत असून लग्नसराईत खरेदीदारांना आज काहीसा दिलासा मिळाले अशी अपेक्षा होती. त्याचदरम्यान अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, लिथियम-आयन बॅटरीच्या निर्मितीसाठी कस्टम ड्युटीमध्ये सूट दिली जाईल. याशिवाय टेक्सटाइल वगळता मूळ कस्टम ड्युटी दर 21 वरून 13 पर्यंत कमी केला जाईल. त्याचबरोबर सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली. त्यामुळे सोने-चांदी आणि प्लॅटिनम महाग होणार आहे. सोने आणि चांदीच्या वस्तूंवर कस्टम ड्युटी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे सोने, चांदी महागणार आहे.
वाचा: देशातील महिलांसाठी खुशखबर,अर्थसंकल्पात मोठी घोषणा
काय स्वस्त होणार?
1) एलईडी टीव्ही
2) टीव्हीचे सूटे भाग
2) इलेक्ट्रिक वस्तू
3) मोबाईल फोन, पार्ट्स
4) इलेक्ट्रिक वाहने
5) खेळणी
6) कॅमेरा लेन्स
काय महागणार?
1) सोन्याचे दागिने
2) चांदीचे दागिने
3) चांदीची भांडी
4) विदेशी किचन चिमणी
5) सिगरेट
पॅन कार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता
डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबत डिजीलॉकरचा वापर वाढवण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे. याशिवाय सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये पॅनकार्ड हे ओळखपत्र म्हणूनही ओळखले जाईल असं त्यांनी सांगितलं आहे.