Union Budget 2023, Women Empowerment : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) आज 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अमृतकालचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. भारताची अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत उज्ज्वल भविष्याकडे जात असल्याचे म्हटलं. जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक चमकता तारा मानले आहे. जगात भारताचा मान वाढला आहे, असेही त्या म्हणाल्या. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.
दरम्यान अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशातील महिलांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेटची घोषणा करण्यात आले. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट उपलब्ध करुन दिले जाणार. दोन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करुन दिले जाईल. 2 लाख रुपये एखादी महिला किंवा मुलीच्या नावे दोन वर्षांसाठी 7.5 टक्के व्याजदरावर गुंतवण्याची सुविधा उपलब्ध. काही प्रमाणात ही रक्कम काढण्याचीही परवानगी असेल. तसेच देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने नवीन योजना आखली आहे. यामध्ये सरकारने देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी नवीन योजना आखल्या असून यामध्ये आत्मनिर्भर भारताचा प्रचारही करण्यात आला आहे. 81 लाख महिला बचतगटांचे सबलीकरण करण्यात येणार आहे. तसेच 28 महिने 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात येणार आहे.
वाचा: 3 वर्षात 38800 शिक्षक-कर्मचाऱ्यांची मेगाभरती, काय असेल पगार आणि सुविधा?
2022-23 या आर्थिक वर्षात महिलांसाठी 1,71,006 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली होती. अर्थमंत्र्यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या मिशन शक्ती, सक्षम अंगणवाडी, मिशन वात्सल्य आणि पोशन 2.0 यांसारख्या योजनांमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली होती. तसेच 2 लाख अंगणवाड्यांचे अपग्रेडेशन करण्यात आले आणि महिला आणि बालकांचा विकास लक्षात घेऊन तीन योजना सुरू करण्यात आल्या. यासोबतच मानसिक आरोग्य समुपदेशनाचा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी 2022-23 च्या अर्थसंकल्पात महिला आणि बालकल्याणासाठी 25,172 कोटी रुपयांची तरतूद केली होती.