Income Tax Slabs In Budget: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitharaman ) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आणि एक ना अनेक चर्चांना उधाण आलं. यामध्ये प्रत्येक क्षेत्राला किती आर्थिक तरतूद केली इथपासून कोणत्या वर्गासाठी किती टक्के (income tax) करसवलत मिळाली इथपर्यंतची माहिती वारंवार वाचली गेली. सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दणदणीत करसवलतीची घोषणा केली. ज्याअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील रिबेटचं प्रमाण वाढवण्यात आलं. थोडक्यात इतकी कमाई असणाऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे यंदाच्या अर्थसंकल्पातील करप्रणालीच्या चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे 1992 वर्षातील (Tax) करप्रणालीची माहिती असणारा एक मेसेज प्रचंड व्हायरल झाला. इंडियन हिस्ट्री पिक नावाच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, '1992 :: New Income Tax Slabs In Budget'. 


1992 मध्ये किती उत्पन्नावर होता Income Tax? 


28000 हजार रुपयांवर त्यावेळी कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नव्हता. 28001 हजार रुपयांपासून 50000 रुपयांपर्यंत 20 टक्के इतका कर, तर 50001 ते 100000 रुपांपर्यंत 30 टक्के कर आकारला जात होता. 1 लाख आणि त्याहून अधिक उत्पन्न असऱ्यांना 40 टक्के कर सोसावा लागत होता असंच या व्हायरल मेसेजमधून समोर आलं. 


1992 मध्ये सत्तेवर कोण होतं? 


1992 मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावेळी नरसिंह राव देशाच्या पंतप्रधानपदी होते, तर मनमोहन सिंग (Manmohan Singh) हे देशाचे अर्थमंत्री होते. तत्कालीन (Finance Minister) अर्थमंत्र्यांनी तीन भागांमध्ये Tax Slab ची विभागणी केली होती. आजच्या दिवशी ज्यावेळी 2023 वर्षासाठीची नवी करप्रणाली लागू होत आहे, तेव्हा नेटकऱ्यांनी लगेचच जुन्या करप्रणालीशी त्याची तुलना करण्यास सुरुवातही केली.



हेसुद्धा वाचा : Budget 2023 : अर्थसंकल्पातून तुम्हाला काय मिळालं? वाचा एका क्लिकमध्ये 


सध्याची करप्रणाली व्यवस्थित वाचा 


निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार यापुढे देशात 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही. तुमचं उत्पन्न 7 लाखांहून 1 रुपयाही जास्त असल्यास त्यात तीन लाख रुपयांपर्यंत तुम्हाला कर भरावा लागणार नाही. पण, 3 ते 6 लाख रुपये उत्पन्न असल्यास 5 टक्के आणि 6 ते 9 लाख रुपये उत्पन्न असल्यास 10 टक्के कर भरावा लागणार आहे. तुम्ही पगारानुसार कराची आकडेमोड केली ना?