Budget 2024 Live Updates: अर्थसंकल्पाच्या आधी संसदेत आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल संसदेत जाहीर केला जातो. या अहवालात चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची स्थिती आणि आगामी आर्थिक वर्षांसाठी अर्थव्यवस्थेचा संभाव्य स्थितीची माहिती दिली आहे. गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. त्यापूर्वी आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी संसदेत आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर करण्यात येईल. त्यापूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवं सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल, अशा विश्वास व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अर्थसंकल्प सादर करतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधताना विरोधकांवर निशाणा साधला आहे.  ते म्हणाले, सर्वांना 2024चा राम-राम, मागील सत्रात नारी शक्ती वंदन अधिनियम पास करण्यात आले. संसदेत नारी शक्तीवर कायदा संमत केला. आजच्या बजेटची सुरूवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने व मार्गदर्शनाने होणार आहे. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडतील. हे पर्व नारीशक्तीच्या साक्षात्काराचे पर्व आहे. तर, नवं सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 


आगामी निवडणुकांच्या काळात पूर्ण बजेट सादर केले जात नाही, हे तर सर्वांना माहिती असेलच. आम्हीदेखील तिच परंपरा पुढे चालवत आहोत. पूर्ण अर्थसंकल्प नवीन सरकार आल्यानंतरच सर्वांसमोर सादर करणार, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे. म्हणजेच आगामी लोकसभा निवडणुकांबाबत मोदींनी सूचक वक्तव्य केलं आहे.



माध्यमांसोबत बोलताना त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. गोंधळ घालणं हा काही लोकांचा स्वभाव असतो. अधिवेशनावेळी गोंधळ घालणाऱ्यांनी एकदा आत्मपरीक्षण जरुर करावं, त्यांनी गेल्या 10 वर्षांत काय केले?, असं सवाल पंतप्रधानांनी केला आहे. 


विरोधकांनी घातलेल्या गोंधळाबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी चांगलेच सुनावलं आहे, सर्व खासदारांना आठवणार नाही. टीका ही धारदार असून शकते पण गदारोळ करता कामा नये. गदारोळ करणाऱ्यांना कोणीही लक्षात ठेवणार नाही. अर्थसंकल्प अधिवेशनात सर्वांना मत मांडण्याची संधी आहे. या परिस्थितीत त्यांनी प्रतिष्ठा राखली पाहिजे. पण काही लोक सवयीने गोंधळ घालतात, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केला आहे