शिमला : शिमला जिल्ह्यातील चौपाल येथे चार मजली इमारत कोसळली. शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुमजली इमारतीचा पाया कच्चा असल्याचे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचल प्रदेशात पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे जीवित व वित्तहानी थांबण्याचे नाव घेत नाहीये. संपूर्ण राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुल्लू आणि बिलासपूरमध्ये ढगफुटीसह चंबा, मंडी आणि शिमला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर आता शिमला जिल्ह्यातील चौपाल येथे चार मजली इमारत कोसळली आहे.


शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुमजली इमारतीचा पाया कच्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीच्या मुसळधार पावसाने इमारतीचा पायाच कमकुवत झाला आणि बघता बघता ही इमारत पत्त्यासारखी कोसळली.



घटनेच्या वेळी इमारतीत कोणीही उपस्थित नव्हते. ही इमारत असुरक्षित असल्याचे पाहून प्रशासनाने ही बहुमजली इमारत रिकामी केली होती. युको बँकेच्या शाखेसह इमारतीमध्ये रेस्टॉरंट आणि ढाबे होते.