बुलंदशहर : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर इथल्या लेडी सिंघम श्रेष्ठा सिंह यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणा-या भाजपच्या नेत्याकडून पोलिसांनी दंड आकारला. त्यावेळी या नेत्यानं दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा सगळा प्रकार गुरुवारी घडलाय. त्यावेळी लेडी सिंघम श्रेष्ठा सिंह यांनी त्यांची बोलती बंद केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कायदा आणि सुव्यवस्था आणण्यासाठी कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेते दबंगगिरी सोडण्यास तयार नाहीत हेच या प्रकरणावरुन दिसतंय.


पाहा लेडी सिंघम श्रेष्ठा सिंह यांचा व्हिडिओ