नवी दिल्ली : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,असाच एक व्हिडिओ प्रचंड धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओत एक बैल ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे.विशेष म्हणजे या बैलासोबत ट्रेनमध्ये प्रवासी देखील आहेत. त्यामुळे ही ट्रेन नेमकी प्रवाशांची आहे की प्राण्यांची आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओत काय? 
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक बैल ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसत आहे. बिहारच्या एका रेल्वे स्थानकात हा बैल ट्रेनमध्ये चढवला गेला होता. ईएमयू पॅसेंजर ट्रेनच्या प्रवाशांना ट्रेनच्या बोगीमध्ये बैल उभा असल्याचे पाहून मोठा धक्काच बसला होता. हा प्रकार पाहून काही प्रवासी डबा सोडून दुसऱ्या बोगीत गेले. तर काहींनी हा क्षण कॅमेऱ्यात कैद करत इंटरनेटवर व्हायरल केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  


स्थानिक वृत्तानुसार, जमालपूरहून साहिबगंजला जाणारी ईएमयू पॅसेंजर ट्रेन मंगळवारी मिर्झाचौकी स्थानकावर पोहोचली. तेव्हा काही खोडकर तरूणांनी हा बैल ट्रेनमध्ये चढवला. तसेच त्याला बोगीतल्या एका सीटवर देखील बांधले. यावेळी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांना रोखले नाही.  



 या घटनेनंतर पुढच्या रेल्वे स्थानकातच प्रवाशांनी बैलाची सुटका करत त्याला ट्रेनमधून खाली उतरवले.  जर या बैलाने ट्रेनमध्ये हल्ला केला असता तर असंख्य नागरीक जखमी झाले असते. मात्र सुदैवाने अशी घटना घडली नाही. दरम्यान या घटनेनंतर बैलाला ट्रेनमध्ये चढवत असताना आरपीएफ, जीआरपीएफ कुठे होते असा सवाल उपस्थित केला जात आहे.