मुंबई : ऑक्टोबरचा महिना संपण्यात येत आहे. सोमवारी नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. यासोबतच काही महत्वपूर्ण बदलांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे. नोव्हेंबरच्या सुरूवातीला देशभरात बँकिंग, घरघुती गॅस बुकिंगचे नियम तसेच रेल्वे क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खर्चावर होणार आहे. (Changes from 1 nov)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 नोव्हेंबरमध्ये होणार हे बदल
1 नोव्हेंबरपासून बँकेत पैसे जमा करण्यापासून ते पैसे काढण्यापर्यंतच्या कामांसाठी शुल्क लागू शकते. म्हणजेच आता पैसे जमा करण्यासाठीदेखील शुल्क भरावे लागेल. गॅस बुकिंगच्या नियमांमध्येही बदल होऊ शकतो. त्यासोबतच रेल्वेच्या टाइम टेबलमध्ये बदल होऊ शकतो. 


2 ट्रेन्सचे नियम बदलणार 
1 नोव्हेंबरपासून भारतीय रेल्वे देशभरातील वेळापत्रकात बदल होणार आहे. 13 हजार प्रवासी ट्रेन आणि 7 हजार मालगाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, 30 राजधानी ट्रेन्सचे वेळापत्रक देखील बदलणार आहे.


3 गॅस सिलेंडरची किंमत
1 नोव्हेंबरपासून घरघुती गॅसच्या किंमतींमध्ये बदल होऊ शकतो. LPG च्या किंमतींमध्ये वाढ केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार एलपीजीवर होणाऱ्या तोट्याला पाहता सरकार पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडरच्या  किंमती वाढवू शकते.


4 गॅस सिलेंडर बुकिंग नियम
1 नोव्हेंबरपासून घरघुती गॅस सिलेंडरची डिलिवरी प्रक्रिया बदणार आहे. गॅस बुकिंगनंतर ग्राहकांना रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवण्यात येईल. तो डिलिवरी बॉयसोबत शेअर करावा लागेल. तो अचुक जुळल्यास गॅस सिलेंडरची डिलिवरी होऊ शकेल.