नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मंत्रालयाने महत्वाचा सल्ला दिला आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवास करण्याआधी हा सल्ला जाणून घ्या. रेल्वेने प्रवाशांना म्हटले की, सुखद आणि आरामदायी प्रवासासाठी मर्यादित सामानच सोबत घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रालयाचा सल्ला
जर तुम्ही जड सामान ट्रेनने पाठवू इच्छित असाल तर, आधी तुम्हाला पार्सल बुक करणे गरजेचे असते. पार्सल म्हणजेच आपला सामान ट्रेनने पाठवणे होय. पार्सल सेवा काही निवडक स्थानकांवर उपलब्ध असते. 
यासाठी तुम्ही सकाळी 9 वाजता तर सांयकाळी 5 वाजेपर्यत स्टेशन पार्सल कार्यालयात बुक करू शकता.



कोरोना संसर्गामुळे अनेक काऊंटर्स बंद झाले आहेत. त्यामुळे आधी माहिती घ्या की, तुम्ही ज्या स्टेशनपासून प्रवास करणार आहात. तेथे पार्सल सेवा सुरू आहे की नाही.


पार्सल कसे बुक करावे
- पार्सल बुक करण्यासाठी सामान आधी पॅक करावे
- यानंतर पॅकेजवर तुमचे नाव लिहावे.
- आता आपल्या सामानावर स्टेशनचे नाव लिहून पार्सल किंवा सामान कार्यालयात घेऊन जावे.
- त्यानंतर पार्सल फॉर्म भरून जमा करा
- आता शुल्क जमा करून पोच पावती मिळवा.
- ज्या स्टेशनवर सामान पोहचवायचा असेल तेथे जा. आता पार्सल कार्यालयामध्ये पार्सल वे बिल दाखवा. 
- त्यानंतर पार्सल तपासून ताब्यात घ्या. 



काय आहे नियम?
पार्सल नियमानुसार, प्रवाशांना निशुल्क सामानाशिवाय अतिरिक्त सामान विना बुकिंग आढळल्यास सहा पट अधिक चार्ज वसूल केला जाईल.
परवानगीपेक्षा अधिक सामान ब्रेकयानमध्ये घेऊन जाण्यासाठी बुकिंग करणे गरजेचे असते.