मुंबई : प्रसिद्ध व्यावसायिक रतन टाटा (Ratan Tata) यांना कोण ओळखत नाही... काही दिवसांपूर्वीच रतन टाटांनी आपल्या तरुणपणीचा एक देखणा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना एक सुखद अनुभव दिला होता. तरुण इंटरनेट युझर्स तर टाटांच्या तरुणपणीचा फोटो पाहून त्यांच्या प्रेमातच पडले... आणि काही क्षणातच त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता रतन टाटा आणि उद्योगजगतातील आणखी एक शिखरावरचं नाव म्हणजे नारायण मूर्ती यांचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. वयानं मोठ्य़ा असलेल्या दोन अत्यंत हळव्या आणि पाय जमिनीवरच असलेल्या माणसांचा एक सुंदर क्षण या फोटोनं आपल्यात कैद केलाय. 


रतन टाटा यांचे आशीर्वाद घेताना नारायण मूर्ती

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं म्हणजे, हा फोटो मंगळवारी मुंबईत पार पडलवेल्या एका पारितोषिक समारंभातील आहे. 'टाईकॉन' (TiECon) या कार्यक्रमात रतन टाटा यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. 


कॉर्पोरेट जगात आपल्या मूल्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी हा पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान केला. 


अवॉर्ड देतानाच स्टेजवर आलेल्या ७३ वर्षीय नारायण मूर्ती यांनी ८२ वर्षांच्या रतन टाटा यांचे चरणस्पर्श करत त्यांचे आशीर्वाद घेतले. इतरांसाठी हाच क्षण अत्यंत भावूक आणि तितकाच प्रेरणादायी ठरलाय.