मुंबई : सणासुदीच्या सिजनमध्ये शेअर बाजारात कमाई करण्यासाठी संधी निर्माण होत आहेत. दुसऱ्या तिमाहीचे निकाल येत असून ब्रोकरेज हाऊस कंपन्यांच्या रिटिंग नव्याने मांडणी केली आहे. कोरोना संसर्गानंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. ब्रोकरेज हाऊसेस काही कंपन्यांमध्ये खरेदीचा सल्ला देत आहेत. सध्याच्या किंमतीपासून या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यास 10 ते 30 टक्के रिटर्न मिळू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Bajaj Finance Ltd
मल्टीबॅगर स्टॉक बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये मोतीलाल ओस्वालने 8650 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. सध्याची किंमत 7478 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. या किंमतीपासून टार्गेट हिट झाल्यास 15 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो.


Axis Bank Ltd
एक्सिस बँक लिमिटेडमध्ये मोतिलाल ओस्वाल (Motilal Oswal)ने 975 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. सध्याची किंमत 787 रुपयांच्या हिशोबाने प्रति शेअर 188 रुपये म्हणजेच 23 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो.


Wabco India Ltd
वेबको इंडिया लिमिटेड आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI securities) ने 9135 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. सध्याची किंमती 7530 रुपयांवर ट्रेड करीत आहे. प्रति शेअर 1605 रुपये म्हणजेच 21 टक्क्यांचा नफा मिळू शकतो. 


Orient Cement Ltd
ओरिएंट सिमेंट लिमिटेड एक्सिस सेक्युरिटीज (Axis Securities) ने 210 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला. सध्याची किंमत 161 रुपयांवर ट्रेड करीत आहे. या स्तरावरून गुंतवणूक केल्यास 30 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो. 


Ambuja Cement
अम्बुजा सिमेंट लिमिटेडमध्ये एक्सिस सेक्युरिटीजने 420 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. सध्याची किंमत 381 रुपयांच्या आसपास आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास 10 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो.


Steel Strip Wheel Ltd
स्टील स्ट्रीप व्हिल्स लिमिटेडमध्ये एक्सिस सेक्युरिटिजने 2150 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. सध्याची किंमत 1810 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. टार्गेटचा विचार केल्यास प्रति शेअर 340 रुपयांचा रिटर्न अपेक्षित आहे.