मुंबई : 8 strong stocks are available at the cheapest prices: जागतिक घडामो़डी अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात केलेली वाढ यामुळे जगातील अनेक शेअर बाजारांमध्येही घसरण नोंदवण्यात आली आहे. पुढील 8 शेअर्समध्ये सध्या गुंतवणूकीच्या संधी आहेत. त्यांची माहिती घेऊ या...


1. फिनोलेक्स केबल्स (Finolex Cables):


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीचा केबल व्यवसाय मजबूत आहे. शेअर सध्या 356 रुपयांवर ट्रेड करीत आहे. पुढील काही महिन्यात या स्टॉक्सच्या माध्यमातून चांगला परतावा मिळवता येऊ शकतो.


2. हिंदुस्तान झिंक (Hindustan Zinc):


गेल्या काही वर्षांत या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. या शेअर सध्या 305 च्या आसपास ट्रेड करीत असून, गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची चांगली संधी आहे.  


 3. आरती इंडस्ट्रीज (Aarti Industries):


आरती इंडस्ट्रीज लिमिटेड ही विशेष रसायने आणि फार्मास्युटिकल्सची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख भारतीय उत्पादक कंपनी आहे. कंपनीचे शेअर सध्या 790 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. या पातळीवर गुंतवणूक केल्यास चांगल्या परताव्याची संधी आहे.


 4. हॉकिन्स कुकर्स (Hawkins Cookers):


ही कंपनी स्वयंपाक घरातील कुकर बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे. हॉकिन्स कुकरचा शेअरमध्येही मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. कंपनीकडे निःसंशयपणे मजबूत ब्रँड इक्विटी आहे. शेअरची सध्या किंमत 5115 रुपयांच्या आसपास आहे. या पातळीवर शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो.


 5. बजाज कंज्यूमर केयर (Bajaj Consumer Care):


बजाज बदाम हेअर ऑइल सारख्या नामांकित ब्रँडची मालकी कंपनीकडे असल्याने हा एक मजबूत शेअर मानला जातो. सध्या शेअर 153 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. गेल्या काही दिवसात शेअरमध्यो मोठी घसरण झाल्याने शेअर गुंतवणूकीसाठी चांगल्या स्तरावर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 


6 गल्फ ऑयल लुब्रिकेंट्स (Gulf Oil Lubricants):


गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स ही ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक वंगण या दोन्ही व्यवसायातील आघाडीची कंपनी आहे. अनेक वर्षांपासून कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड मजबूत आहे.  शेअर सध्या 405 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. बाजाराच्या पडझडीचा फटका शेअरला ही बसला होता. शेअरमध्ये घसरण झाल्याने आता पुन्हा गुंतवणूकीची संधी निर्माण झाली आहे. 


7. कल्पतरु पावर ट्रांसमिशन लिमिटेड (Kalpataru Power Transmission Limited): 


 कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड ही कंपनी जागतिक पॉवर ट्रान्समिशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर ईपीसी स्पेसमधील सर्वात मोठ्या  कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचा शेअर 341 रुपयांवर ट्रे़ड करीत आहे. सध्या हा शेअर गुंतवणूकीसाठी चांगल्या स्तरावर ट्रेड करीत असल्याने येथून खरेदी केल्यास, चांगला परतावा अपेक्षित आहे. 


8. मणप्पुरम फायनान्स (Manappuram Finance):


या शेअरची किंमत 229 रुपयांवरून हळूहळू 109 रुपयांपर्यंत घसरली आहे.  सोन्याच्या माध्यमातून कर्ज देण्यात मणप्पुरम फायनान्स आघाडीवर आहे. कोविडच्या काळात कंपनीला खूप फायदा झाला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.