मुंबई : देशातील 6 राज्यांतील 7 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे (Byelection Result) निकाल लागले आहेत. बिहारमधील मोकामा येथे आरजेडी, तर मुंबईच्या अंधेरी पूर्व मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी विजय मिळवला आहे. भाजपने बिहारमधील गोपालगंज, यूपीमधील गोला गोकरनाथ आणि हरियाणातील आदमपूर आणि ओडिशातील धामनगरची जागा जिंकली आहे. तेलंगणातील मुनुगोडेमध्ये टीआरएस आघाडीवर आहे.


भाजपचा 4 जागांवर विजय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशातील धामनगरची जागा भाजपने 9802 मतांनी जिंकली आहे. येथे भाजपचे सूर्यवंशी सूरज यांना 80090 मते मिळाली. तर बीजेडी उमेदवार अबंती दास यांना 70288 मते मिळाली. भाजप आमदार बिष्णू सेठी यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. भाजपने सेठी यांचे पुत्र सूर्यवंशी सूरज यांना उमेदवारी दिली होती. तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बीजेडीने अंबाती दास यांना तिकीट दिले होते.


TRS एका जागेवर आघाडीवर


तेलंगणातील मुनुगोडे जागेवर टीआरएस पुढे आहे. मतमोजणीच्या 13 फेऱ्यांनंतर टीआरएसचे उमेदवार के. प्रभाकर रेड्डी 9146 मतांनी आघाडीवर आहेत. भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे.


यूपीच्या गोला गोकरनाथ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराच्या विजयानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अभिनंदन केले आहे. सीएम योगी म्हणाले की विराट विजयासाठी सर्व कष्टकरी कार्यकर्त्यांचे आणि आदरणीय मतदारांचे हार्दिक अभिनंदन. हा नेत्रदीपक विजय म्हणजे डबल इंजिन असलेल्या भाजप सरकारच्या लोककल्याणकारी धोरणांवर जनतेच्या अढळ विश्वासाचे प्रतीक आहे.


आरजेडीला एक जागा


बिहारमधील मोकामा मतदारसंघात आरजेडीच्या उमेदवार नीलम देवी विजयी झाल्या आहेत. तर गोपालगंजची जागा भाजपने ताब्यात घेतली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील गोला गोकर्णनाथ मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अमन गिरी यांनी विजय मिळवला आहे.