मुंबई : भारतीय रिझर्व बँकेचे विद्यमान गवर्नर शक्तिकांत दास यांच्याबाबत केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय़ घेतला आहे. शक्तिकांत दास यांच्या गवर्नर पदाचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2021 पासून पुढील 3 वर्षाच्या अवधीसाठी किंवा पुढील आदेश मिळेपर्यंत जे आधी होईल तोपर्यंत वाढवण्याला मंजूरी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 सप्टेंबरला कार्यकाळ संपणार 
आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ या वर्षी 10 डिसेंबरला संपणार आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांसाठी वाढवला आहे. शक्तिकांत दास 10 डिसेंबर रोजी 26 वे गवर्नर म्हणून पदभार सुरू ठेवतील.



11 डिसेंबर 2018 ला नियुक्ती
शक्तिकांत दास यांनी 11 डिसेंबर 2018 रोजी भारतीय रिझर्व बँकेच्या गवर्नरपदी झाली होती. याआधी अर्थ मंत्रालयामध्ये ते सचिव पदावर कार्यरत होते. माजी गवर्नर उर्जित पटेल यांच्या राजिनाम्यानंतर रिझर्व बँकेने शक्तिकांत दास यांची नियुक्ती केली आहे.